Tuesday 7 April 2015

चारोळ्या

चारशे पानाचे पुस्तक वाचुनही
जितके समजत नाही तितके चार
ओळी वाचून समजले जाते त्यास
चारोळी म्हणतात.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@                         
Contract ची नोकरी ही 'रखेली'  सारखी असते रखेल कसी मन आणि खिशा भरला की निघून जाते तसच काहिस  या contract च्या नोकरीच असत.कधी सुटेल काही नेम नसतो.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मला काही गोष्टी अजूनही उमगल्या नाहीत........
नाती ही रक्ताची असतात ना ..मग ती परक्या सारखी
का वागतात ...अन् परकी माणसे आपल्या सारखी का वागतात

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

जनावारे सुद्धा कळप करून राहतात
मग, सर्वश्रेठ अश्या मानव प्राण्यास
विभाक्तिचा अट्टाहास का???

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

अजूनही आठवतय तूझ ते पाठमोर जाण ...
.....अन्.......नकळत माग वळून पाहान

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

लोकल मधे चढताना लोक शेळीसारखे
वागतात पण आत चढल्यावर मात्र
तेच लोक बाहेरच्या लोकांनवर
वाघासारखे गुरगुरतात

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

काही माणसे डोक्यात जातात तर काही माणसे
मनात घर करतात दोन्ही प्रकार माणसांचेच मग
माणसा माणसात इतका फरक कसा???

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

पाळलेला 'कुत्रा' आणि  जपलेला 'माणूस' यांच्यापैकी
कोणाकडून जास्तीत जास्त दगफटका होण्याची शक्यता असते??.........मग सर्वश्रेठ कोण 'माणूस'
की  '......' ????

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

'प्रेम' हे नजरेतून होते
न बोलताच सारे काही
कळते.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

'बाळ' जेव्हा स्वतः  'बाप' होतो
तेव्हा त्याला खरा 'बाप' कळतो

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

'मन' हे कस हळव असत .नकळत कुणाकडही
वळत . अन् नकळत त्याचच होउन बसत

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

एकदा माणूस संसारात पडला की 
उठता उठत नाही , उठतो ते फकत
चार खांद्यावरच...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

अशी माणसे 'समाधान' शोधतायेत
ज्याच्यां दिवसाची सुरवात लोकल
च्या कचाटयात होते अन् दिवसाचा
शेवटही त्याच कचाट्यातुन सूटन्यात
होतो..

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

भावा भावाच नात जिवाभावाच असत
शेवटी ते 'वाटणी' वर येउन तुटत.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

बहीण भावासाठी तीळ तिळ तुटायची
सरकारला हे ही पाहावल नाही म्हणून
का त्यान वडीलोपार्जित संपतीत तिचीही
टक्केवारी टाकली.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

खरं सुख कुठ गवसत???
पैशाच्या ढिगात
दारूच्या गुत्यावर
प्रेयशीच्या मिठीत
की आईच्या कुशीत??
        मग
तीच आई वूध्दाश्रमात कशी??

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

माणूस दोन पायावरून ,दोन चाकी
दोन चाकीवरून, चार चाकी
चार चाकी वरून ,अधांतरी फिर फिर
फिरतो इतक कशासाठी तर ....सुखासाठी
पण ..खर सुख खरचं गवसत का???

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

शर्माची 'पिंकी' आणि पाटलांचा 'पिंटया' नेहमी
एकाच लिफ्ट मधून तोंड पुसत बाहेर पडताना
दिसायचे त्यांच तोंड पुसन्यामागच 'गुपित' त्यानी
न सांगता आपसुकच सगळ्याना कळायचे.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

'बॉयफ्रेंड' ही संज्ञा हळूहळू सर्वच
मुलिंना जूळू लागलेय ..अन् त्यांच्या
बरोबर दोन मुलांच्या आयानाही ती
कळू लागलीय.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

'पदर'  आणि 'ओढणी'
काळाआढ गेली आणि
गावातील पोर उनाड झाली.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

'लीव्ह इन रिलेेशनशिप' हा नविन प्रकार रुजू लागलाय
यात म्हणे लग्नाचे बंधन नसते .आपल्या मर्जीप्रमाने
कधीही आपण बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड बदलू शकतो.
पण शेवटी यांची अवस्था एकाच रूमालाला सतराजणानी नाक पुसल्यागत होते.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

'मित्र' हा 'दोस्त' असतो ना..
मग , राज  कपूर असे का
म्हणतो 'दोस्त' दोस्त ना रहा??

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मराठी माणसाला सर्व खपेल
पण आपल्याच माणसाची
झालेली 'प्रगती' खपनार नाही

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

शंभर मुली पाहील्यावर त्यातील एक
आपण 'बायको' म्हणून निवडतो ....
आणि पुढे काही दिवस गेले की
त्याच बायकोला आपण डोक्यात
जाऊ नको असे वारोंवार बजावतो.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

पूर्वी लग्न झाले की घरात पाळणा
हलन्यास एक दोन वर्ष लागायची
हल्ली लग्नानंतर सहा महिन्यातच
घरात पाळणा हलतोय.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

गावाकडची हिरवळ ओढ  लावते .....अन् .......
शहरातील 'सीमेंट'ळ  (झगमग म्हणा) भुल पाडते
पण ,.....भुल ही तात्पुरती असते. आणि ओढ ही
कायमची असते.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

व्यायाम शाळेत जाऊन जाऊन
शरीराचा 'दगड' केला,पण मनाचा
दगड कसा करायचा ही कला मला
अजूनही जमली नाहीय.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

जगात सर्वात भितीदायक प्राणी कोण
असेल तर तो म्हणजे 'माणूस' कारण
तो पाठीमागून वार करतो.......#

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

ये गुलाब के फुल भी बडे अजीब
होते है । जुबा नही है इन्हे
लेकीन बया बहुत कुछ करते है।

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

घरी परतन्याची ओढ तेव्हाच असते
जर कोणी तरी आपली वाट पाहत
असेल आणि वाट पाहान्यालाही तेव्हाच
अर्थ असतो ..जर कोणी येणार असेल.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

पोटात दुःखाचे अंगार घेउन चेहर्यावर हास्याचे
कारंजे फूलवन्याची कला जमली की जीवन
जगने जमलेच ....समजा.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

जीवनाची सुरवात जरी शुन्यातुन झाली
तरी त्याचा शेवट भव्य-दिव्य असा व्हावा
तरच जगलेल्या जीवनाला अर्थ आहे
नाहीतर ते व्यर्थ आहे.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

कोणत्याही गोष्टीचे Attitude असणे ठीक आहे
पण माज नसावा ...कारण इतिहास साक्षी आहे की
ज्याना ज्याना माज आला त्यांचा शेवट फार
दयणीय झाला.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

पूर्वी 'शोले' खुप खुप चालला
न् हल्ली 'हंन्टर' मात्र त्यातील
दृश्यानीच गाजला...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

यश हे मागुन मिळत नाही
ते राबुन मीळवायचे  असते.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

संवाद ही इश्वराने मानवाला
दिलेली अमूल्य अशी देणगी
आहे .पण आजच्या पिढी
तोच हरवत चाललाय.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मला खेळ हरल्याचे दू:ख नाहीय
दुःख इतकेच आहे ..की मला तो
खेळ निट खेळताच आला नाही.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

कसलेले शरीर आणि कमावलेली संपत्ती
दीर्घकाळ साथ देतात याउलट ...मस्तवाल
शरीर आणि लुबाडलेली संपत्ती अर्ध्यावर
सोडून जातात.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मला माहीत आहे की तु
मला टाळत आहेस.....
पण तूझ्या या टाळण्यातुनच
तू हळू हळू  माझ्याकडेच वळत
आहेस....

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

पोट सूटण्यापेक्षा आर्म्स
सूटलेले केव्हाही चांगले

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

लग्ना आधी माणूस कसा सुसाट असतो
लग्ना नंतर त्याच्या वेगावर बंधन येते
आणि हे बंधन येण्याचे कारण एकच असते
ते म्हणजे त्याच्या अंगावर पडलेली जबाबदारी
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

Friday 3 April 2015

निरागस हसण

हसने ही मानवाला लाभलेली नैसर्गिक देणगी आहे. त्या साठी कोणतेही मूल्य द्यावे लागत नाही.  फक्त असावा लागतो मनाचा मोकळेपणा तरीही काही माणसे हसताना खिसातून पाचशेची नोट काढावी लागल्यागत का करतात कुणास ठाऊक. जीवन म्हटले की चढ़उत्तार येतच राहतात. खर तर सुख:दुःखाच्या उन्ह पावसात झोडपुनच आपण कणखर व्हायचे असते. कधी कधी जीवनात दुःखाचे इतके ढग दाटून येतात की आपण त्या अंधारात स्वताला झोकुन देतो.समोर दिसतो फक्त निराशारुपी काळोख, आणि आपण स्वताला त्यात हरउन घेतो. जणू काही सर्व संपले आहे असा समज करून आपण दुःखाला कवटाळून बसतो. मन गहिवरून येते डोळे भरुन येतात, खुप खुप रडावेसे वाटते.ठीक आहे रडायच पण कस जगाकडे पाठ करुन, पण परत फिरताना आपल्या चेहर्यावरचे हास्य कायम असल पाहिजे. दुःखाला किती दिवस कवटाळायचे हे आपल्यावर असते. एक दिवस, एक आठवडा,एक महीना की एक वर्ष. बस तीतून पुढे सारे विसरायचे  आणि नव्या उमेदीने, नव्या जोमाने पुनः या जगसमोर यायचे, कारण ही दुनिया रडणार्याला नाही,तर आलेल्या संकटावर स्वार होऊन आनंदाची शिकरे पादाक्रांत करणार्यालाच सलाम करते.देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा तो आपल्यासाठी दुसरे दार उघडतो तो तसा खट्याळच आहे म्हणा,आपली फिरकी घेण्यात एकदम माहिर, तो जितके आपणास दुःख देतो त्याच्या दुप्पट सुखही देतो,फक्त आपण हार मानायची नाही. देवाला कुणीलीही पाहिले नाही तो निराकार आहे असे आपले ग्रंथ सांगतात.तरीही आपण त्याला आकारात बांधून ठेवलेय.  देव सर्वव्यापी सर्वज्ञानीआहे. त्याला अनुभवायचे असल्यास आपल्याकडे हवे निर्मळ मन व निरागस हास्य.
       हसन्याने वादळे शमतात हसन्याने भांडने मिट्तात हसन्याने प्रेमांकुर अंकुरतो हसन्याने नवी नाती जुळतात ही भाषा सोपी ही कळे बोबड्या बाळा, ही कळे गाईच्या मुक्या वासरा मग तुला रे कशी ना कळे मानवा ?....  
     
                                 @ अशोक मटकर

      

Wednesday 1 April 2015

जिवन बिमा

जब कर्ता कमाये पैसे चार
तब चले जिवन संसार
चले बच्चों को शिक्षा
बुढे माँ बाप की लाठी
पत्नी के ख्वाहिशोओ की पुर्ती
हसता खेलता परिवार सारा
जब कर्ता कमाये पैसे चार

सुबह से निकले दिनभर भागे
खुशहाली पाने के लीऐ
दिन गुजरे ,उमर गुजरी
दौलत कमाने मे

सपने आखों मे लिए
दिनरात भागे ये बेचारा
एक ही चाह मे कि..मंगल
कर दु परिवार का जिवन सारा

सारी खुशीया डाल दु
उनके कदमों में,,हसरते
सारी पुरी कर लू इसी जनम मे
इस चाह में बेचारा दिनरात भागे

गवान न करें कीसी काल की
नजर ना लगे इसको.. बिखर ना जाऐ सपने
इसके ना रह जाए अरमान अधुरे

इस काल से बचना है तो बिमा करा लो भैया
यह चिराग है अल्लादिन का..तू रहे या ना रहे पार करेगा ये तेरे अरमानो की नय्या........

ये तेरा साया है तेरा रोल निभायेगा
जो देखे थे सपने तुने ये वो पुरे करवाऐगा
ये है डुबती नय्या का सहारा
जिवनसागर का किनारा
बुढापे की लाठी..सपनों की पुर्ती

                          @ अशोक मटकर
                               08484049707