Monday 27 July 2015

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे माया, प्रेम म्हणजे विश्वासरूपी छाया.
प्रेम म्हणजे वात्सल्यरूपी आई, प्रेम म्हणजे मंदिरातला साईं.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे मैत्रीची साद, प्रेम म्हणजे आपुलकीचा हात.
प्रेम म्हणजे नादितील पाणी, प्रेम म्हणजे मंजुळ गाणी.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे यशोदेचा कान्हा, प्रेम म्हणजे दुधारू गाईला फुटलेला पान्हा. प्रेम म्हणजे चिमुकला पाहुणा, प्रेम म्हणजे लागलेला जीव्हाळा.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे राबनारा बाप, प्रेम म्हणजे कुणाच्यातरी विरहाने लागणारी धाप, प्रेम म्हणजे बहिणीची राखी,
प्रेम म्हणजे मास्तरानी हातावर मारलेली काठी.

प्रेम म्हणजे काय?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे पाठीचा भाऊ ,प्रेम म्हणजे शिवबाची जिजाऊ. प्रेम म्हणजे पुरवलेली हौस, प्रेम म्हणजे मनातला पाऊस.

प्रेम म्हणजे काय?...तर नुसता नरमादीचा गेम नाय
प्रेम म्हणजे सुटलेले घर, प्रेम म्हणजे पाखराची घरटयाकडे परतीची ओढ. प्रेम म्हणजे मनातली खंत, प्रेम म्हणजे न कळणारा अंत.

प्रेम म्हणजे काय? तर...नुसता नरमादीचा गेम नाय
प्रेम म्हणजे केलेला त्याग ,प्रेम म्हणजे मनातली आग.
प्रेम म्हणजे शुध्द भावना ,प्रेम म्हणजे काहीच कळेना

प्रेम म्हणजे काय? तर...नुसता नरमादीचा गेम नाय.

                                 @ अशोक मटकर

Sunday 26 July 2015

सावळे रूप

सावळे हे रूप
गोजिरे सगुण
पाहता हरपली
तहान भूक

एकादशी वारीला
येती भक्तगण
भजनी कीर्तनी होई
सारा आसमंत दंग

दुथंडली चंद्रभागा
आली त्याच्या चरणी
लागे भक्ताची रांग
त्याच्या द्वारी

युगायुगाचा हा महिमा
काय वर्णु याची ख्याती
तिन्ही काळांचा अधिपती
विठ्ठल सावळा

रंक आणि राव
नाही इथे भेदभाव
विसरुनी सारे होती
एक...जातपात

चरणावरी ठेविता माथा
दुःख हरले आता
लाभे मनास समाधान
त्याच्या मंदिरी..

साकडे घालितो वारकरी
ठेव सुखिसमाधानी....
दे अंगात बळ...
येइन चालत पायी
तुझ्या वारीला

असा हा देव जगात आगळा
ज्याचा ठायी संताचा गोतावळा
भक्ताची माउली दिनांची साउली
अखंड उभा विठेवरी ठेउनी कर
कटेवरी....
                        
                      @ अशोक मटकर

Wednesday 15 July 2015

तो आणि ती

       रात्रीचे नऊ साढेनऊ झाले असतील, तो कोल्हापुरला जाणार्या वॉल्वो बसची वाट पाहत दादर टीटी ला उभा होता . येणार्या बसला थांबउन त्याने जागा आहे का विचारले. समोरून बस कंडक्टर ने आहे म्हटले. त्याने कंडक्टर जवळ विंडो सिट आहे का विचारले कंडक्टर म्हणाला "साहेब एकच सिट रिकामी आहे ती पण कैन्सल झाली म्हणून, येताय तर चला." सुट्टीचा हंगाम होता त्यामुळे त्याने निदान बसायला मिळाले या वर समाधान मानून कंडक्टर ला टिकीट विचारले . कंडक्टर ने चारशे रुपये सांगितले . त्यावर तो म्हणाला "दादा मागच्या आठवड्यात गेलेलो साढेतीनशे घेतलेल". यावर कंडक्टर थोडासा वैतागुनच म्हणाला "साहेब सीझन आहे . एकच सिट राहिले जमतय तर बघा नाहीतर निघतो आम्ही, भाजीमार्केट सारखी स्थिती झालीय आम्हा टुरीस्ट वाल्याची कोन कितीहीलाही मागतो काय ईज्जतच नाय राहिली आम्हा राव" .कंडक्टर चे असे बोलने ऐकल्यावर तो थोडासा खजिल झाला. कुठल्या सीटवर बसु असे त्याने कंडक्टर ला विचारले.
               कंडक्टर ने त्याला रिकामी असलेल्या सिट कडे बोट दाखवत तिथे जाऊन बसा असे सांगितले.तो त्या सिटजवळ गेला. त्या सिटवर विंडो सिटजवळ त्याच्या समवयस्क एक मुलगी बसली होती. इअरफ़ोन कानात आणि हातामधे मोबाइल ,मोबाइल मधे ती इतकी गुंतली होती की तिचे बाजूला लक्ष्यही नव्हतं. जणू काही मोबाइल मधे तल्लीन झाली होती. मनाची एकाग्रता कशी वाढवायची या विषयावर त्याने खुप काही ऐकल होत. पण मोबाइल नावाच्या या यंत्रात मानवाला खिळवुन ठेवण्याची जी असीम ताकत आहे ती कुठल्याही योग धारणेत आढळणार नाही, असे तिच्याकडे पाहिल्यावर त्याला वाटले . त्याने मागे वळुन कंडक्टरकडे पाहिले .कंडक्टरने त्याला हातानेच इशारा करुन तिथेच बसन्यास सांगितले. तो थोडासा सावरतच सीटवर बसला. आणि ती अचानक शुद्धिवर आल्यासारखी ताडकन उठली,आणि तिने कंडक्टर ला जोरात हाक मारली. कंडक्टर धावतच तिथे आला . तिच्या शेजारी जो बसला होता त्याला नेमकं काय झालय हेच कळेनासे झाले.
             कंडक्टरला तिने विचारले "तुम्ही म्हणाला होतात की बाजूला लेडीज सिट आहे म्हणून", त्यावर कंडक्टर म्हणाला "हो होती ना पण कैन्सल झाली म्हणून याना दिली थोडे सांभाळून घ्या मैडम" .ती थोडीसी वैतागतच खाली बसली. कंडक्टरने त्याच्याकडे तिकीटाचे पैसे मागितले . त्याने चारशे रुपये पकिटातून काढून त्याला दिले. ती हे पाहून कंडक्टरला म्हणाली हे काय मझ्याकडून तुम्ही साढेचारशे रूपये घेतलेत .तुमची विंडोसिट आहे म्हणून साढेचारशे,  नको का विंडोसिट ? कंडक्टरने उलट तिलाच सवाल केला. ती वैतागतच ठीक आहे म्हणाली . कन्डक्टर तिथून निघुन गेला . त्याने सिटवर डोके टेकले . तुमचा प्रवास सुखाचा होवो अशी समोर लावलेली पाटी त्याला दिसली .त्यातील 'सुखाचा' हा शब्द त्याला अडगळनीचा वाटला .त्याने तिला विचारले  "कोल्हापुर का?" .ती "हो" म्हणाली ."एकटयाच चाललाय? "त्याने तिला विचारले .ती त्याला म्हणाली "माझे घर कोल्हापुरला आहे. मी इथे इंजिनीयरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. आजच शेवटचा पेपर झाला ,म्हणून निघालेय गावी .आईबाबा सकाळच्या गाडीनेच ये म्हणालेले, पण मीच निघालेय". शाळा कॉलेजसाठी आईवडीलापासून दूर होस्टेलवर राहनारी मुले पूर्ण वर्ष काढतील पण शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच बैग पैक करुन ठेवतील पेपर दिला रे दिला की मिळेल त्या गाडीने आपआपल्या गावाची वाट धरतील. कारण त्या नंतरचा प्रत्येक  क्षण त्याना त्या काढलेल्या वर्षापेक्षाही मोठा वाटतो.
                   "तुम्ही फार धाडसी आहात?" तो तिला म्हणाला ."होवावेच लागते धाडसी ,पर्यायच नाही" तिने टोला लगावला. "मग ,इंजिनीरिंग तुमचे आवडते फिल्ड असनार?" त्याने तार छेडली. ती म्हणाली "स्कोप आहे खुप या फिल्ड ला?"......"हो"......"आणि खुप पैसा पण आहे" त्याने तिचे वाक्य पूर्ण केले. "थोडेसे परसेंटेज कमी पडले नाही तर बाबा मेडिकलसाठी पर्यत्न करत होते" पुढे ती म्हणाली. "म्हणजे बाबांच्या चॉइसवरुन तुम्ही करियर निवडले तर ?"तो तिला म्हणाला...."हो ना".. ती म्हणाली आणि हल्ली सर्वांचीच पहिली पसंती मेडिकल नाहीतर इंजीनियरिंगला असते". तो तिच्याकडे पाहुन हसला ,आणि म्हणाला "म्हणूनच आपल्याकडे क्वचितच एखादा तेंडुलकर,कुसुमाग्रज,लता मंगेशकर,किंवा अब्दुल कलाम होतो ,डॉक्टर आणि इंजीनियर मात्र खुप होतात".त्याचे हे बोलने ऐकून तिच्या डोक्यात घंटानाद झाला.ती क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली.तिच अस एकटक पाहण त्याच्या मनावर गुदगुदल्या करुन गेल. ती सावरली आणि मान हलवत "राईट " म्हणाली.कारण त्याने अशा थोर व्यकतीमत्वाची नावे घेतली होती की, त्यांच्यापुढे तिला सर्व काही शुल्लक वाटत होते.ती विचारात मग्न झाली.
                तिच्या त्या चिन्ताक्रांत चेहर्याकडे  पाहुन तो म्हणाला काही चुकले का माझे? ती हसूनच नाही म्हणाली.बस एका स्टॉप वर थाबली .खिडकी बाहेर पाण्याच्या बाटल्या विकनारा तिला म्हणाला "थंड पानी हवय का मैडम वीस रूपए बाटली" .तिने त्यांच्याकडून एक बाटली घेतली आणि शंभर रुपयांची नोट पुढे केली.त्याने तिच्याकडे वीसरुपये सुट्टे मागितले .तिने नाही म्हटले .त्यावर तो म्हणाला "तुमच्याकडे नाहीत तर साहेबाकडून घ्या ", हे ऐकून त्याने त्या पनिवल्याला  विस रूपए  देऊ केले .ती त्याला म्हणाली "मी तुमचे पैसे पुढच्या स्टॉपला सुट्टे झाले की देते" .तो तिला म्हणाला "असुदेत नाही दिले तरी चालतील" .बस  मार्गस्थ झाली. बसची लाईट बंद झाली. ती थोड़ी बावरली,  हा अंधाराचा फायदा तर घेणार नाही ना? अशी स्रीसुलभ भावना तिच्या मनामधे उमटली .पण का कुणास ठाऊक तिला तो तसा वाटत नव्हता? या क्षणभराच्या प्रवासात तिचा त्याच्यावर विश्वास जडला होता.तरी पण ती थोडी खिडकीकडेला सरकली .दोघामधे एक वितेचे अंतर होते. तिने आपली लेडीज बैग दोघामधे ठेवली.
                  तिने इयरफोन कानास लावला व मोबाइल वरील गाणी ऐकत डोळे मिटून घेतले. त्यानेही आपला मोबाइल काढला व फेसबुक चाळू लागला. अंधारातुन पुढुन येणाऱ्या गाड्याच्या हेडलाइटचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. आणि त्या अधुनमधुन पडणार्या प्रकाशात तो तिला नेहाळत होता.तिचा चेहरा जणू त्याला ढगाआड लपणाऱ्या चंद्रागत भासत होता.तो तिच्यात गुंततच चालला होता. क्षणभर त्याला वाटले की तिला तिचे नाव विचारावे व तिला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करावी.....पण त्याने स्वताला आवरले. ती निद्रेच्या अधीन झाली होती. तो तिच्याकडे पाहत होता . तिच्या केसाची बट तिच्या गालवर रुळट होती. ती तिची झोपमोड़ करेल असे त्याला वाटले.त्याने मनाशी धाडस करुन थरथरत्या हाताने तिच्या केसाची बट मागे केली.दोघाच्या मधे असणाऱ्या त्या लेडीज बैग कडे बघत तो मनातल्या मनात हसला .व तो ही झोपी गेला.बस रस्ता कापण्याचे काम करत होती.बस मधील इतर प्रवाशीही गाढ झोपले होते. तो झोपेत तीचेच स्वप्न पाहत होता .तिच्याबरोबर प्रणयाची चित्र रंगवत होता.त्याला त्याच्या खांद्यावर कसलेतरी ओझे जाणऊ लागले .त्याने डोळे उघडुन पाहिले झोपेत तिन तिच डोक त्याच्या खांद्यावर ठेवले होते.त्याला तिला उठवावेसे वाटले .पण त्याला तिची झोप मोड करायची नव्हती.झोपेतला तिचा तो निरागस चेहरा त्याचा मनावर भुरळ पाडून गेला.तो तिला न उठवताच पुनः झोपी गेला.बस रस्त्यावरील खड्डयामुळे थोडीसी हादरली. त्यामुळे तिला जाग आली.तिने पाहिले तिच डोक त्याच्या खांद्यावर होते.तिने स्वताला सावरले व पुनः खिडकी कडेस सरकुन बसली . तिन त्याच्याकडे पाहिल, तो झोपेत होता.ती खिडकीतुन बाहेर पाहु लागली . बाहेर पहाटेचा मंद प्रकाश अंधारावर आपले साम्राज्य पसरवत होता.कोल्हापुर काही अंतरावर होत.
               कंडक्टर ने आवाज दिला."उठा कोल्हापुर आल".प्रतेकाने आपले सामान बरोबर घ्या.नंतर तक्रार ऐकली जाणार नाही".या आवाजाने त्याला जाग आली.त्याने डोळे उघताच तिच्याकडे पाहिले.ती खिडकीतून बाहेर पाहत होती. त्याने पायाखालची बैग उचलून बाहेर घेतली.तिने ही आपली बैग आवरली.तो तिला म्हणाला "झोपेत कधी कोल्हापुर आले हे कळलच नाही".ती त्याच्याकडे पाहून म्हणाली "हो ना झोपेत काही कळलच नाही".तिच्या बोलण्यातील उपरोधिकपना त्याला जाणवला .त्याने तिच्याकडे पाहून स्मितहास्य केले.पण तिने हसन्याचे टाळले.तिच ते गप्प बसन त्याचा मनाला लागुन गेल. तो काही बोलणार इतक्यात बस थांबली. कन्डक्टर ने आवाज दिला "चला उतरा कोल्हापुर आल".सर्व प्रवासी उतरण्यासाठी गडबड करु लागले.त्यानेही आपली बैग उचलली ,तिच्याकडे पाहत मंद पाऊले टाकत तो बस मधुन खाली उतरला . खाली उतरल्यावर तो तिथेच थाबुंन तिच्या उतरण्याची वाट पाहत होता.ती बस मधुन उतरली व समोर उभ्या असणाऱ्या मानसाकडेेे पाहून हसली. कदाचीत ते तिचे वडील असावेत असा यास त्याने बाधला.त्या माणसाने तिच्याकडची बैग घेतली.व ती त्याच्या बरोबर चालू लागली.तो तिच पाठमोर जाण टक लाऊन पाहत होता.त्याला असे वाटत होते की, कदाचीत ती मागे वळून पाहिल.या आशेवर तो तिथेच उभा होता.आठ तासांच्या प्रवासात त्याला साधे तिचे नाव सुद्धा माहित नव्हते.तरी तो तिच्यात गुंतला होता.तिच चालन शुरूच होत.आणि तो ते पाहत होता.ती थोड्या अंतरावर जाऊन थांबली. याच्या हृदयाची धडधड वाढली. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या मनात आनंदाचे कारंजे फुलले.
                  ती परत फिरली. ती त्याच्या दिशेने येऊ लागली.तो तिच्याकडे पाहतच राहिला.तिच परत येण म्हणजे त्याच्या जीवनाला मिळणार नव वळण होत.त्याची नजर फक्त तिच्यावर खिळुन होती . तिच्या कडून ते शब्द ऐकन्यासाठी त्याचे कान आसुसले होते.ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. त्याच्यासाठी हा त्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता.ती त्याच्यासमोर उभी होती आणि तो तिला पाहत होता.त्याच्या तोंडातून शब्द फूटत नव्हते.शेवटी तीच म्हणाली "हे घ्या तुमचे वीस रूपये सॉरी हं विसरले पुढे गेले आणि लक्षात आले. बाबाकडून कडुन घेतले मागुन माझ्याकडे सुट्टे नव्हते. तो काहीच बोलला नाही.निशब्द पूतळ्यासारखा उभा होता. तिने वीस रूपये त्याच्या हातावर टेकवले आणि निघून गेली.त्याच्याकडे तिच्याकडे पाहन्यावाचुन दूसरे काहीही नव्हते. त्याने स्वताला सावरले आणि वर आकाशात पाहत छातीवर हात ठेऊन एक लाब श्वास घेतला व स्वतःशीस म्हणाला .....सावर रे......सावर रे.....

                                 @ अशोक मटकर

Saturday 11 July 2015

तडजोड

तडजोडीच जीण आता जमु नाही लागलय
तूटपुंज्या नोकरीत मन रमु नाही लागलय
रोजचच झालय हे नाकासमोरच चालन
आणि आहे त्यात समाधान मानुन जगण

पाच आकडी पगार सुद्धा पुरू नाही लागलाय
अपेक्षाचा भार काही सरू नाही लागला
स्वप्ननाचा वणवा उरात पेटलाय
समोर मात्र काळोख दाटलाय
राबराब राबतोय ,एक एक धागा जोडतोय
जीवनरूपी चित्रात एक एक रंग भरतोय

अजब आहे ही जीवनाची शाळा
नाही इथे पाटी आणि फळा
रोजच इथे नविन धडे आणि नव्या वाटा
शिकताना उमगे गुपीत जीवनाचे

देवाच देऊळ ही  झालय दुकान
पन्नास रूपये ते हजारापर्यन्त
फूलांच्या पाट्या...............
सामान्यासाठी लांबलांब रांगा
श्रीमंतांसाठी व्हीआयपी पास

देवांच्या देवळातही असा भेदभाव
पैस्याच्या जोरावर ठरतात
इथे रंक आणि राव
सामान्यांची आहे उलटीच व्यथा
दानपेटी समोर चाचपडतात खिशा

फाटक्या खिशातून निघत एखाद नाण
दानपेटित टाकून करतात गार्हाण
बस..झाल, आता हे तडजोडीच जीण
       
                           @ अशोक मटकर