Tuesday 4 August 2015

स्माइल

लोग अपने स्टेटस में स्माइल वाला स्टिकर चिपका देते है। वह दिखने में भी अच्छा दिखता है, लेकिन वह स्माइल अपने चेहरे पर कैसे लाये । ...ऐसी स्माइल पाने के लिए दिल साफ़ और बंदा नेक होना चहिये।
           
                                     @ अशोक मटकर

Monday 3 August 2015

मित्र

मित्र
सखा सोबती
लंगोटी यार
एकमेकात असलेल
वात्रट प्यार

मित्र
मुक्त पाखरे
बेधुंद उडनारी
दूरवर पसरली
तरी कट्यावर
जमणारी

मित्र
कधी खोडी
कधी गोडी
क्षणात वैरी
क्षणात यारी

मित्र
खट्याळ वारा
बुडत्याचा सहारा
संकटातील साथ
एक वेगळीच
वहिवाट

मित्र
मैदानी खेळ
टपरीवरील भेल
पोहण्यातील चुरस
कोण आहे सरस ?

मित्र
शाळेला दांडी
घरच्यांना शेंडी
सिनेमाचा पास
मोकळा श्वास

मित्र
प्रेमाचा धागा
विपरीत त्रागा
एकच वादा
अखंड मैत्रीचा

             @ अशोक मटकर

माती

कधी कधी आपण आपल्या अंगावर थोडीजरी माती पडली ...तरी ती आपण पटकन झटकुन टाकतो..आपणास तिची कीळस वाटते ...पण कधी विचार केलाय का ...जेव्हा साऱ्या जगाला आपण नकोसे होतो ..सारे आपले नातेवाईक चार खांद्यावर उचलून आपणास घेऊन जातात ..तेव्हा ही मातीच आपणास तिच्यात सामाउन घेते ..आत्मा अंतराळात विलीन होतो आणि शरीराची जळून उरलेली राख या मातीत विलीन होते....
                                       @ अशोक मटकर