Friday 30 October 2015

क्षणाचा सोबती तू

क्षणाचा सोबती तू
का असा आलास
जीवनाच्या चित्रात
अर्धेच रंग भरून
गेलास

नाशिबाने थट्टा
याधिही मांडली
दुखाने तर पाठच
नाही सोडली

जणू पाचविलाच
पूजले होते सारे
कधीही न गवसनारे
आकाशातील तारे

बालपनीच शिकले
संसारातील तरतूद
हौसमौज विसरून
जगण हिरमसुंन

साधा लवलेशही
दिसला नाही जगास
अस तयार केलेले
मी स्वतास

स्वताबरोबर बाबांच
घर ही सावरल
बुडत्या नोकेला
किनारी लावल

कशीबशी शोधली वाट
केला पार अवघड घाट
तुझ्याशी मांडला
नव्या जीवनाचा थाट

वाटल आता होईल
सुरळीत सारे
टळतील नाशिबाचे
भोग सारे
गवसतील स्वप्नातील
तारे

होईल नवी पहाट
खुलेल भाग्याचे ललाट
येईल नवी आनंदाची लाट
मांडीन मी संसाराचा थाट

माझ्या वेड्या मनास
काय ठाऊक?? की
नियती करेल पुनः घात
सोडसील तू अर्ध्यावर साथ

काळाच्या धुक्यात तू
हरवलास...पार
शितिजापार निघुन गेलास
जाताना तुजा अंश
देऊन गेलास

आता आहेत आठवणी
फक्त उरी दाटलेल्या
मोकळ्या प्रतिमा
काळजात फाटलेल्या

कधी कधी हुंदके
अनावर होतात
मूक्या भावना
नयनातून ओघळतात

जगाकडे पाठ करून
धाय मोकलुन रडले
परत फिरताना हास्य
चेहर्यावर जपले

केलय मी स्वतास खंबीर
नको कुणाचा उसना धीर
कितीही संकटे येऊ देत
पाठ माझी घेऊन देत

बजावलय स्वताला
हरायाच नाही
रडायच नाही
फक्त लढायच

                    @ अशोक शंकर मटकर

(एका खंबीर व धैर्यशील स्त्रीस समर्पित)