Monday, 29 June 2015

श्रावणधारा

बरसल्या श्रावणधारा
सुटला गार वारा
तुप्त झाली धरणी
या  धारात भिजुनी

शहारले रान
झाले हिरवे पान
हुंदडती गाईवासरे
जणू आल नव अवसान

पाझरले झरे 
दुथंडल्या नदया
पेरल बळीराजान
मोत्याच् दान

बिज अंकुरली
मातीच्या गर्भातून
नवजीवन फुलले
या श्रावणधारातुन

फुटली झाडांना पालवी
उमटले मनात नवचैतन्य
चहुकडे आल्हाद
या ऋतुमधे

                   @ अशोक मटकर