जीवनाच्या प्रवासातील शेवटच ठिकाण.... स्मशान !.. ईथं आल की माणसाचा सारा अहंकार,घमंड मी पणा जळुन खाक होतो आणि उरते ती फक्त राख...इथे सगळ्यासाठी एकच नियम असतो..एक मात्र आहे जाणारा माणूस भले त्याचे आयुष्य कसेही जगला असेल शेवटी मात्र राजेशाही थाटात जातो ..चार खाद्यावर दिमाखात आड़वा झालेला असतो ..तो पुढे पुढे जात असतो आणि प्रजा मागे मागे जात असते...मरण एक भयानक सत्य... एक विदारक वास्तव..प्रत्येकाला एक ना एक दिवस याला सामोरे जायचे आहे ..हा जायची तारीख मात्र विधात्याने गुपित ठेवली आहे..अपल्या सर्वाना आपली डेट ऑफ बर्थ माहित असते पण डेट ऑफ डेथ .....???....माहित नसते..म्हणून येणाऱ्या प्रयेक दिवस भरभरून जगावा ..मानस जापावीत ..कारण शरीर क्षणभंगूर आहे ते आज ना उद्या नष्ट होणार ..मागे राहणार ते तुमचे गुण.. तुमचा व्यवहार....✍️