Friday, 3 April 2015

निरागस हसण

हसने ही मानवाला लाभलेली नैसर्गिक देणगी आहे. त्या साठी कोणतेही मूल्य द्यावे लागत नाही.  फक्त असावा लागतो मनाचा मोकळेपणा तरीही काही माणसे हसताना खिसातून पाचशेची नोट काढावी लागल्यागत का करतात कुणास ठाऊक. जीवन म्हटले की चढ़उत्तार येतच राहतात. खर तर सुख:दुःखाच्या उन्ह पावसात झोडपुनच आपण कणखर व्हायचे असते. कधी कधी जीवनात दुःखाचे इतके ढग दाटून येतात की आपण त्या अंधारात स्वताला झोकुन देतो.समोर दिसतो फक्त निराशारुपी काळोख, आणि आपण स्वताला त्यात हरउन घेतो. जणू काही सर्व संपले आहे असा समज करून आपण दुःखाला कवटाळून बसतो. मन गहिवरून येते डोळे भरुन येतात, खुप खुप रडावेसे वाटते.ठीक आहे रडायच पण कस जगाकडे पाठ करुन, पण परत फिरताना आपल्या चेहर्यावरचे हास्य कायम असल पाहिजे. दुःखाला किती दिवस कवटाळायचे हे आपल्यावर असते. एक दिवस, एक आठवडा,एक महीना की एक वर्ष. बस तीतून पुढे सारे विसरायचे  आणि नव्या उमेदीने, नव्या जोमाने पुनः या जगसमोर यायचे, कारण ही दुनिया रडणार्याला नाही,तर आलेल्या संकटावर स्वार होऊन आनंदाची शिकरे पादाक्रांत करणार्यालाच सलाम करते.देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा तो आपल्यासाठी दुसरे दार उघडतो तो तसा खट्याळच आहे म्हणा,आपली फिरकी घेण्यात एकदम माहिर, तो जितके आपणास दुःख देतो त्याच्या दुप्पट सुखही देतो,फक्त आपण हार मानायची नाही. देवाला कुणीलीही पाहिले नाही तो निराकार आहे असे आपले ग्रंथ सांगतात.तरीही आपण त्याला आकारात बांधून ठेवलेय.  देव सर्वव्यापी सर्वज्ञानीआहे. त्याला अनुभवायचे असल्यास आपल्याकडे हवे निर्मळ मन व निरागस हास्य.
       हसन्याने वादळे शमतात हसन्याने भांडने मिट्तात हसन्याने प्रेमांकुर अंकुरतो हसन्याने नवी नाती जुळतात ही भाषा सोपी ही कळे बोबड्या बाळा, ही कळे गाईच्या मुक्या वासरा मग तुला रे कशी ना कळे मानवा ?....  
     
                                 @ अशोक मटकर

      

No comments:

Post a Comment