कुणीतरी मला विचारले
"काय कमावलस"???
मी म्हटले "'शब्द'"
त्याने म्हटले '"शब्द'"
क्षणभर थांबला तो
पुढे म्हणाला "काय
किमंत आहे या
"'शब्दांना'"??
मी म्हटले "हो ना
काहीच किमंत नाही
या '"शब्दाना'.".... मीही
क्षणभर थांबलो
मी पुढे म्हणालो "नाही
या शब्दाची किमंतच
करता येणार नाही"???
कारण हे "'शब्द '"
'अनमोल' आहेत
तो म्हणाला " 'वेडा'
आहेस तू "
मी म्हटले "हो ना
आहे मी 'वेडा'
म्हनुनच सुचत सारं
अन् मनात दरवळत
हे 'शब्दरूपी' वारं"
तो म्हणाला "कस
जमत तुला हे सारं"
मी म्हणालो "जमत
नाही आपोआप
जमुनच येत सारं"
मी पुढे म्हणालो
"जेव्हा मिळते
भावनेला साद
जेव्हा कोणी
मारतं आर्त हाक"
तेव्हा आपसुक
येते लेखणी हातात
आणि कागदावर
उमटतात हे
अनमोल '"शब्द'"
@ अशोक शंकर मटकर
खुप छान
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete