रात्रीची अकरा साढे अकराची वेळ रामचंद्र काका आपल्या रात्रीच्या ड्यूटी ला नुकतेच आले होते. एका कारखाना वजा कंपनीमधे ते वाचमन ची नोकरी करत होते.नोव्हेबर महिना चालू होता त्यामुळे थंडी जाणवत होते. घरातून नुकतेच रात्रीचे जेवण करून आले होते.तस पाहिले तर त्याना नोकरी करण्याची काही गरज नव्हती .नुकताच त्यानी एका प्राव्हेट लिमिटेड कंपनी मधून व्ही .आर .एस घेतला होता .त्यामधून त्याना बर्यापैकी पैसे मीळाले होते . मुलगा इंजिनीयर
व मुलगी डॉक्टर होती . दोघाची ही लग्न झाली होती. सुन ही त्याना वडीला प्रमाणे मानत होती.त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नव्हती .सुन व मुलगा तुम्ही काम नका करु म्हणून नेहमी बजावत असत. पण रामचंद्र काका त्यांचे कधी ऐकत नसत .उलटे त्याची समजुत काढत अरे ,दिवसबर घरात पडून असतो .काय काम नसत मग रात्रीची झोप कशी लागणार ? म्हणून जातो नाईट शिफ्ट ला .आणि तिथे तरी कुठे ओझी उच लायची आहेत. बसून तर काम आहे. तसी अधून मधून डुलकी ही काढतो मी कंपनी बंद असते रात्री. त्यामुळे चोरी वगैरेची काही भीती नाही.
रामचंद्र काकाच्या पत्नी मुलाच्या लग्नानंतर अवघ्या महीना भरात त्यांना सोडून देवाघरी गेल्या होत्या. त्यांना ब्लड कैंसर होता .डॉक्टर ने सहा महिन्याची त्यांची गँरण्टी दिली होती त्यामुळे मुलांची पटकन म्हातारीच्या डोळ्यासमोर रामचंद्र काकानी लग्न लाउन दिली . आयुष्यभर सुखदुखात जीने साथ दिली तीच हे अचानक सोडून जान त्याच्या जिव्हारी लागल होत. जीवानातील उन्हपाउस त्या दोघांनी अंघावर घेत गरीबीतुन श्रीमंतिकडे झेप घेतली होती. आपल्या गरिबिची झळ मुलाना न लागू देता रात्रीचा दिवस करून रामचंद्र काकानी व त्यांच्या पत्नीनी आपल्या दोन्ही मुलाना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन समाजात मानाचे स्थान मीळउन दिले.रामचंद्र काकाचा दिवस कसाबसा जायचा पण रात्र त्यांच्या उरावर बसायाची . म्हणून त्यानी रात्री नोकरी करण्याचा मार्ग स्वीकारला होता.
नेहमीप्रमाणे त्यानी कंपनीच्या कंपाउंड मधे पडलेला पाला गोळा केला व गेटच्या बाहेर आणून जवळच्या काडेपेटीने पेटविला .व त्या शेकोटी जवळ धग घेत खुर्ची वर बसले होते. थंडी पासून बचावासठी कानाभोवती मफलर गुंडाळला .वर आकाशात लुकलुकनार्या तार्याकडे पाहून म्हणाले अस मला एकाटयाला सोडून का गेलीस?? .ठरवल होत ना आपण मूल मार्गी लागली की ,आपण गावी राहायला जायच म्हणून ? आयुष्याची संध्याकाळ त्या निसर्गाच्या रम्य सानिध्यात घालवायची म्हणून ? आयुष्यभर राबराब राबुन थकलेल्या या देहाला त्या मातीत मिसळायचे होते. जिथे आपल्या वाडवडिलाच्या पायाचे ठसे उमटले त्या पवित्र भूमीत आयुष्याचे उरलेले दिवस संपवायाचे होते. पण तू गेलीस सोडून एकट्याला. एकटा जाउन काय करू?? घर खायला उठेल मला ,तसा आपला बाबू आणि सुनबाई मला काहिही कमी पडू देत नाहित. खुप काळजी घेतात माझी.दोघे ही दिवसभर कामानिमित बाहेर असतात.मी आजुबाजुच्या मित्राराबरोबर गप्पा मारन्यात दिवस कसाबसा घालवतो पण रात्र काही जाता जात नाही .
म्हणून इथे ही रात्री ची ड्यूटी घेतलीय .जिवनांत
परतेक कसोटीच्या वेळेस तू मला धीर द्यायचिस आणि आता सुखाची संध्याकाळ आली असताना अचानक तू निघून गेलीस . जुन्या आठवणी वेड लावतात म्हणून इथ नोकरीच्या निमिताने का होइना तूझ्याबरोबर गप्पा मारायला मीळतात.आज सगळी सूखे पायासी लोळतायेत पण , तू नाहीस ना मग त्या सुखाना काय किंमत? रामचंद्र काकाच्या या विचारचक्रात शेकोटी कधी थंड पडली ते त्याना कळलेच नाही. अंगाला जाणवऱ्या थंडीने ते भानावर आले .त्यानी बैगेमधील शाल काढून अंगाभोवती गुंडाळली आणि हातामधील HMT घड्याळामधे वेळ पाहिली. रात्रीचे सव्वा बारा वाजले होते. त्यानी आपल्या सभोवताली एक कटाक्ष टाकला .त्यांच्या पासून थोड्याच अंतरावर असणार्या
बसस्टॉप वर जाउन त्यांची नजर स्थिर झाली.त्या बस स्टॉप वर कौणीतरी उभा होते.असेल कौनीतरी शेवटच्या बसची वाट पाहत अशी त्यांची समजुत झाली.
थोड्या वेळात बस आली .पण ती व्यक्ती बस मधे चढलीच नाही . बस च्या प्रकाशात रामचंद्र काकानी पाहिले ती व्यक्ती म्हणजे एक मुलगी होती. साधारण चौविस पंचवीस वर्षाची असेल असा अंदाज रामचंद्र काकानी बांधला . पण इतक्या रात्री एका निर्जन रस्त्यावर ती कुणाची बर वाट बघत असेल , रामचंद्र काकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली . तिचे घरचे काळजी करत असतील . तिच्याकडे पाहून ती चांगल्या घरातील असावी असा कयास काकानी बांधला. तिला जाउन विचाराव अस त्यांच्या मनात आले पण परत त्यानी विचार केला की ती त्यातली तर नसेल ना?? ..
रामचंद्र काकाच्या मनात चांगल्या व वाईट विचारांच द्वंद्व सुरु झाल. इतक्यात त्यांच्या जवळून एक जिप गेली .त्या जीप मधे पाच सहा जनांच टोळक होत. ते टोळक आरडाओरडा करत रस्त्याने चालल होत.त्यावरून रामचंद्र काकाना कळले की ते नक्कीच
प्यायलेले असणार. जीप बसस्टॉप पासून थोडी पुढे जाउन थाबंली .आणि थोड्या वेळाने रिवर्स मागे येउन बसस्टॉप जवळ थांबली . त्या जीप मधून एकजण खाली उतराला व तिच्यासी लगट करण्याचा पर्यत्न करू लागला. तीचा लटका प्रतिकार पाहून त्यांना आणखी चेव आला. बाकीचेही जीप मधून खाली उतरले .रामचंद्र काका हे सर्व दुरून पाहत होते .बसस्टॉप काकापासुन बर्याच अंतरावर होता त्यामुळे त्याच्यातिल संवाद रामचंद्र काकाना ऐकु ऐत नव्हता. पण , त्यांच्यामधे चाललेल्या हालचालिवरून रामचंद्र काका त्यांच्यात काय चालले आहे त्याचा अंदाज बांधू शकत होते पण त्याना आडविन्याचे सामर्थ त्यांच्यात नव्हते. इतक्यात त्यांच्यातील एकाने तिची ओढनी खेचली . भुकेलेल्या लांडग्याच्या तावडीत एखादी हारिण सापडावी अशी तिची अवस्था होती .
वेळेचा फायदा घेत त्या सर्वानी तिला उचलून बसस्टॉपच्या मागे असलेल्या झाडीत नेले. आणि सर्व लांडगे त्या असहाय देहावर तुटून पडले . रामचंद्र काकाना झाडीतल्या प्रकारचा अंदाज आला .पण ते काहीही करू शकत नव्हते .त्याना अडविन्याची ताकत त्यांच्यात नव्हती. थोड्या वेळाने एक एक करून सारे लांडगे बाहेर आले व जीप मधे बसून निघून गेले. पण ती बाहेर आली नव्हती काय झाले असेल तिचे .मारून तर टाकले नसेल ना तिला? रामचंद्र काकाच्या मनात विचारांचे काहुर माजले कारण, या पापाचे ते एकमेव साक्षीदार होते. सकाळी ड्यूटी संपली की या झालेल्या प्रकाराची पोलिस स्टेशन ला जाउन तक्रार करण्याचा विचार रामचंद्र काकाच्या मनात आला . पण पोलिस आणि कायद्याच्या वाटेला सामान्य माणूस जात नाही .उद्या त्यानी उलटसुलट तपासणी साठी फेर्या मारायला लावल्या तर ? असे नाना विचार काकाच्या मनात येऊ लागले.
इतक्यात त्याना त्या झुडूपाची पाने हलताना दिसली. ती चाचपडत धडपडत झुडूपा बाहेर आली . तिच्या अंगावरील कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या तीने स्वतःला सावरले आणि रस्ता क्रॉस करूत हळू हळू तिथूनच थोड्या अंतरावर असलेल्या झोपडपट्टीच्या दिशेने चालु लागली . रामचंद्र काकानी तिच्या पाठमोर्या आकृती कडे पाहून हात जोडले व मनात फुटफुटले मला माफ कर मुली हा असहाय्य म्हातारा तुला मदत नाही करू शकला .माझ्या मुलीच्या वयाची तू पण हा बाप काहीच करू शकला नाही. माफ कर मुली मला माफ कर . पूर्ण रात्र काकानी स्वतःला दोष देण्यात काढली .सकाळी घरी गेल्यावर त्यानी कुणाशीही या गोष्टीची वाच्यता केली नाही.की पोलिसात तक्रार नोंदवली .रात्री परत रामचंद्र काका ड्यूटीला आले .नेहामिप्रमाणे मफलर गुंडाळला .कालच्या आपल्या आसहायपनाची त्यांची त्यानाच कीव येत होती .काय झाल असेल त्या मुलीच तिन जिव तर दिला नसेल ना . काय अवस्था झाली असेल तिला पाहून तिच्या आई वडिलांची या साऱ्या विचारांनी रामचंद्र काका सैरभैर झाले होते.
काकानी आपल्या हातातिल घड्याळात वेळ बघतली .रात्रीचे पावने बारा झाले होते. नकळत त्यांचे लक्ष समोरच्या बसस्टॉप कडे गेले. आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली . त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता .कारण काल जी मुलगी त्यानी विध्वस्त होताना पाहिली तीच मुलगी आज पुन्हा नटून थटून पुन्हा त्या बसस्टॉप वर उभी असलेली त्याना दिसली . ज्या मुलीसाठी काका रात्री पासून तिळ तीळ तुटत होते .तिच्या काळजीने ते व्याकुळ झाले होते .त्याच मुलीचा असा अवतार पाहून ते हैरानच झाले.का अस वागत असेल ती? पैसे कमविन्यासाठी?
इतका खालचा थर गाठावा माणसाने ? काल पासून जिची काकाना कणव वाटत होती .तीची आज त्याना कीळस वाटू लागली. पण रामचंद्र काकाचे मन मानायला तयार नव्हते की ती या प्रकारातील असेल. कारण काकाना तिच्यात तो साराईतपणा दिसत नव्हता.
रामचंद्र काकाना बसस्टॉपकडे येणारी स्कूटर दिसली. त्या स्कूटरवर दोघेजण होते. त्यांच्या हालचाली वरुन ते प्यायलेले वाटत होते . ते बसस्टॉप जवळ थांबले पुढे काय घडणार याची कल्पना काकाना आली
हे पाप बघन्यापेक्षा काकानी खाली मान घालून पेपर वाचने पसंद केले. थोड्या वेळानी स्कूटरला किक मारल्याचा आवाज ऐकून त्यांचे लक्ष पुन्हा बसस्टॉप कडे गेले. ते दोघेजण आपले काम उरकून निघून गेले. आणि थोड्या वेळाने ती नेहमीसारखी धडपडत झुडपातुन बाहेर आली .आणि झोपडपट्टीच्या दिशेने निघून गेली. रामचंद्र काका रोज ही तालीम पाहत होते .ती रोज रात्री नटूनथटून बसस्टॉप वर यायची आणि रोज नविन नविन लांडगे तिच्या देहावर तुटून पडायचे. आणि ती आपला विस्कटलेला देह सावरत पुन्हा समोरच्या झोपडपट्टीत निघून जायची .
आज रात्री घरून निघताना रामचंद्र काकानी मनाशी ठरविले की काही झाले तरी आज त्या मुलीला भेटायचे तिच्या अश्या वागण्या मागे काय कारण आहे ते त्याना समजुन घ्यायचे होते. त्याच्या साठी ते एक कोडे होते ते तिला भेटल्यावरच सुटणार होते.ते रात्री ड्यूटीला गेले .आणि बस स्टॉप कडे ती येण्याची वाट पाहू लागले .नेहमीप्रमाणे ती नटूनथटून आली व बस स्टॉपवर थांबली .काका आज ठरउनच आले होते की तिला भेटायचे तरी पण काकाना त्यांच्या मनाने अडवीले जर ती उलट काही बोलली तर ?? अश्या प्रकारे जर-तर च्या हींदोळयावर काकाचे मन मागे पुढे करू लागले. रोज असच चालायचे .काकाना काही धीर होत नव्हता . आणि वाटेने जाणारे दारुडे तिच्या देहाची विटंबना करायचे. तिलाही त्या बद्दल काही तक्रार नव्हती . उलट रोज ती स्व:त सावज बनून या लाडंग्याच्या स्वाधीन व्हायची . आज ही तेच होणार होते .सावज स्वत: लाडंग्याची वाट पाहत उभ होतेे की या आणि मला खा म्हणून. लाडंगे आले तिच्या देहाचे लचके तोडले आणि जीभा पुसत निघून गेले. ती नेहामिप्रमाणे झुडूपातुन बाहेर पडली .
काकाना हे रोजच होत. पण आज ती थकल्यासारखी वाटत होती .बसस्टॉपवरील बाकड्यावर ती सावरत सावरत बसली . व दोन्ही हातात चेहरा पकडून खोल नजरेने जमिनीकडे पाहू लागली .जणू काही भुमातेला आपल्यात सामाउन घे अशी हाक देत होती. तिची अवस्था बघून काकाना राहावल नाही .त्यानी आपल्या जवळची शाल व पाण्याची बाटली बरोबर घेउन तिच्या दिशेने झपझप पाउले टाकत चालु लागले. ते तिच्यापाशी येउन थांबले . ती शांतपणे दोन्ही हातात चेहरा लपउन खाली पाहात होती.तिच्याकडे पाहून काकाना वाटले की कदाचित तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल.काकानी धाडस करून तिला हाक मारली . मुली आज घरी जायच नाही का?. काकाचे शब्द तिच्या कानावर पडले आणि ती दचकली या लाडंग्याच्या जंगलात आपुलकीने कुणी तरी हाक दिली होती. तिच्या अंगावरील कापडाच्या चिंध्या झाल्या होत्या. तिने आपल्या हातातील तोंड बाजुला करत ककाकडे पाहिले .काकाना तिच्या चेहर्यावर कोणतीही अपराधिक पणाची भावना दिसत नव्हती. तिच्या त्या रक्ताळलेल्या डोळ्यात विजयाची चमक दिसत होती.
काका क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिले. ते तिला म्हणाले काय चालविले आहेस हे मुली? तूझ्याकडे पाहिल्यावर तर वाटत नाही की तू त्या प्रकारातील असशील म्हणून? मग हां स्वैराचार का?
ती काकाकडे नजर रोखून पाहू लागली.काकानी आपले म्हणने आवरते घेतले .व मागे परतले .तिने आवाज दिला थाबा बाबा .काकाचे पाय जाग्यावर थांबले. ते मागे वळले .तिच्या डोळ्यात प्रतिशोधाची आग दिसत होती. तिने कंठ फोडला काय वाटते तुम्हाला की मी इथे येउन धंदा करते .पैसासाठी आपला देह विकते .नाही बाबा नाही मी सूड घेतीय सूड .काकाच्या डोक्यात कुणीतरी जोरात घन मारावा तसी काकाची अवस्था झाली .सूड आणि असा? काकानी तीला प्रतिप्रश्न केला .ती म्हणाली हो ना असा .या माजलेल्या कुत्रान्या
धडा शिकवायचाय मला ? एका एका ला संपवायच आहे? त्या साठी येतेय मी इथे मुर्त्युचा सापळा बनून
रोज नविन नविन सावज गळाला लावायला .
काकाना क्षणभर वाटले की ही वेडी तर नाही ना ?त्यानी तिला विचारले असा कोणी सूड घेत का ही कुठली पद्धत स्वतःच्या देहाला नरकप्राय यातना देऊन सूड घेण्याची . इतका वेळ अंगार ओखनाऱ्या तिच्या डोळ्यातून अचानक आसवाच्या धारा बरसू लागल्या. काकानी आपल्या हातातील पाण्याची बाटली पुढे केली व आपल्या अंगावरील शाल तिच्या अंगावर पांघरली
तिने पानी पित पित स्वतः ला सावरले . व काकाकडे
पाहून म्हणाली सहा महिन्यापूर्वी एका रात्री मला ऑफीस मधून सूटन्यास उशीर झाला .मी बस ची वाट पाहत एका बस स्टॉप वर उभी होते . समोरून एक व्हँन आली व माझ्यासमोर थाबली .त्यातील लोकानी मला आत ओढून घेतले .व एका निर्जन ठिकाणी नेउन माझ्यावर सामूहिक बलात्कार केला . सगळे दारू पिउन
तट्ट होते. माझी विनवणी कुणीही ऐकली नाही. सर्वानी आपली वासना शमवील्या नंतर मला जिथून उचलले तिथे आणून सोडले व पसार झाले .मी जड पावलानी घरी परतले. माझी अवस्था बघून आईने पटकन दार लाउन घेतले . तिला मी काही न सांगताच सर्व कळले .
मी तिच्या खांद्यावर डोक ठेउन धाय मोकलून
रडले. झालेल्या प्रकारची कुठेही वाच्यता करू नकोस
असा बाबानी दम भरला.पुढच्या आठवड्यात पाहुने येणार आहेत बघायला तुला . उगाचच बदनामी नको
व्हायला .एक वाईट स्वप्न म्हणून आपन हे सर्व विसरून जाऊ असे बाबानी समजाविले. पण माझे मन तयार नव्हते लग्न करायला . कारण माझ सर्वस्व लुटल होत.आणि एखाद्याचा घात करन मला जमणार नव्हते.
मी घरात सांगुन टाकले की मी लग्नच करणार नाही म्हणून .असेच चार महीने निघून गेले. हळू हळू माझी
प्रकृती खालाऊ लागली .मला अस्वथ वाटु लागले .एक दिवस अचानक ताप भरला. डॉक्टर ने ब्लड चेक करण्यास सांगितले .रक्ताचे रिपोर्ट आले आणि जगण्याची उमेदच संपली. समोर मृत्यु दिसु लागला
तो ही पटकन न येणारा. खंगुन खंगुण मारणारा. आता रोज त्याच्याकडे भिक मागायला लागणार होती .हे असहाय वेदानानी जगण्यापेक्षा मला या देहातुन मुक्त कर अशी विनवणी करावी लागणार होती .डॉक्टरानी
मला एडस झाला असल्याचे सांगितले.
घरात जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा सर्वानी मला
जणु मला वाळीतच टाकले. प्रतेकजन माझ्याशी बोलने टाळू लागला. आई बाबा आपल्या नशिबाला दोष देत होते. आम्ही कोणते पाप केले म्हणून हे असे पाहणे आमच्या नशिबी आले. हे सारे पाहिले खुप वाईट वाटायचे . देवाने मला जन्मालाच का घातले त्या वेळीच का नाही संपविले .मला स्वता:चिच कीळस वाटु लागली
पण यात माझी काय चुक होती .काहीच नव्हती तरीही मला सर्व भोगायला लागले होते. मग मी निश्चय केला की समाजातील या प्रवृतिच्या नराधमाना अद्द्द्ल घडवायची .त्याना त्याच्या पापाची शिक्षा दयायची.म्हणून इथे प्रतेक रात्री येते नटून थटून मुत्युचा
सापळा बनुन .या लिंगपीसाटाची शिकार करायला . मला शिकार शोधावी लागत नाही. शिकार स्वत:हुन येते माझ्याजवळ मरणाच्या डोहात डूुबायला .
आजवर कितेकानी येउन माझ्यावर मर्दानगी गाजविली .पण त्याना कुठे ठाउक आहे .पुढे काय वाढून ठेवले आहे ते. अश्या षंडाना धडा शिकवन्यासाठी चाललाय हा देहाचा बाजार . जो पर्यन्त शेवटचा स्वास
आहे तो पर्यन्त सोडणार नाही या कुत्र्याना .चला बाबा
निघते आता .घर आहे म्हणून जायच .आता ना माझी
कोणी वाट बघत .ना माझी कोणी काळजी करत. सगळ्यानी मला वेडी ठरवलय .म्हणतात तिच्या डोक्यावर परिणाम झालाय .कुठेही फिरत असते रात्री अपरात्री .सगळे माझी जाण्याची वाट बघतायेत. माझी
अडचण झालीय सर्वाना . चला उद्या पुन्हा यायच आहे
नविन सावजाच्या शिकारीला .या शरीराने व मनाने भोगलेल्या यातनाचा सूड घ्यायला .इतके बोलून ती झोपडपट्टीच्या दिशेन हळू हळु निघुन गेली . रामचंद्र काका एक मूक दगड होउन तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहतच राहिले.
@ अशोक शंकर मटकर
मनाला स्पर्शून गेलेल्या काही गोष्टी.... सुचलेल्या, अनुभवलेल्या, ऊमगलेल्या व मनास भावलेल्या...मनात खोलवर रूतलेल्या..गोष्टी..सर्वासमोर मांडतोय माझ्याच शब्दात...माझ्याच शैलीत...@अशोक शंकर मटकर
Wednesday, 2 March 2016
सुड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment