मनातल्या गोष्टी
मनाला स्पर्शून गेलेल्या काही गोष्टी.... सुचलेल्या, अनुभवलेल्या, ऊमगलेल्या व मनास भावलेल्या...मनात खोलवर रूतलेल्या..गोष्टी..सर्वासमोर मांडतोय माझ्याच शब्दात...माझ्याच शैलीत...@अशोक शंकर मटकर
Wednesday, 27 July 2022
स्मशान
Sunday, 7 August 2016
पुल-भुल
पुल तुटला, तोल सुटला
पुरात सारे वाहुन गेले
खुप जगायचे होते राव!
पण! जगायचेच राहुन गेले
कस घडल सार ! काय कळलच नाही
चुकला काळजाचा ठोका
दिला काळांन धोखा
सारं आक्रित घडल
थोड विपरीत घडल
ऊरलेले आयुष्य सावित्रीमाईत बुडंल
प्राण कधी गेला कळालच नाही
देह मात्र मुक्तीसाठी तडफडतोय
त्याभोवती मगर,मासे आणि
किडे वळवळतायत
इंग्रजांनी दिलेली धोक्याची घंटा
आमचा मिटेना आपसातील तंटा
जो तो म्हणतोय मीच बडा अन्
चुकाचे खापर दुसर्यावर फोडा
दोष कुणाचा, चुक कुणाची
यातच भांबावलेत सारे....
अरे! सोडा ती भांडणे
आधी शोधा आम्हाला
आणि सरणावर न्या रे!
शेवटचा पाहु द्या......
या मिटलेल्या डोळ्यांनी
अर्ध्यावर सुटलेला संसार अन्
फुटू द्या श्वासात अडकलेला फुंत्कार
मग बांधा कधीही
तो तुटलेला पुल
पण पुन्हा करू नका
अशी कधीही भुल
तुमच काय? तुमच्या तिजोर्या
भरल्यात राव..अन् जनतेच्या
चुली विझल्यात राव!
@ अशोक शंकर मटकर
Sunday, 26 June 2016
भेटणारी माणसं
भेटणार्या माणसांना 'मोत्या' सारख जपाव
म्हणजे ती 'नात्या' मध्ये बदलतात . मग ते
नात कोणतही असो दिर्घकाळ टिकत.
@ अशोक शंकर मटकर
इंसांन और जानवर
इन्सांनो की भिड मे जानवरो की कोई कमी नही है
शक्ल सुरत से तो हम इन्सांन नजर आते है ..लेकीन
कभी कभी हमारी करतुतो से हमे ये महसुस होता है
की, इन्सांन और जानवरो में फरक ही कितना बचा है.
@अशोक शंकर मटकर
शब्द
मला शब्दांची 'शस्ञे' करायला कधीही जमणार नाही
मी शब्दांची 'फुले' करेन कारण, 'जखम' देण्यापेक्षा सुगंध देणे कधीही चांगले.
@ अशोक शंकर मटकर
Saturday, 21 May 2016
जुगलबंदी
एक दिवस खेळू
शब्दांची जुगलबंदी
असशील तू
शब्दांची 'खाण '
मला पण आहे
शब्दांच 'वाण'
कदाचित हरेन
मी या खेळात
पण , या हरण्यात ही
असेल जिंकण्याची शान
@ अशोक शंकर मटकर