Saturday 11 July 2015

तडजोड

तडजोडीच जीण आता जमु नाही लागलय
तूटपुंज्या नोकरीत मन रमु नाही लागलय
रोजचच झालय हे नाकासमोरच चालन
आणि आहे त्यात समाधान मानुन जगण

पाच आकडी पगार सुद्धा पुरू नाही लागलाय
अपेक्षाचा भार काही सरू नाही लागला
स्वप्ननाचा वणवा उरात पेटलाय
समोर मात्र काळोख दाटलाय
राबराब राबतोय ,एक एक धागा जोडतोय
जीवनरूपी चित्रात एक एक रंग भरतोय

अजब आहे ही जीवनाची शाळा
नाही इथे पाटी आणि फळा
रोजच इथे नविन धडे आणि नव्या वाटा
शिकताना उमगे गुपीत जीवनाचे

देवाच देऊळ ही  झालय दुकान
पन्नास रूपये ते हजारापर्यन्त
फूलांच्या पाट्या...............
सामान्यासाठी लांबलांब रांगा
श्रीमंतांसाठी व्हीआयपी पास

देवांच्या देवळातही असा भेदभाव
पैस्याच्या जोरावर ठरतात
इथे रंक आणि राव
सामान्यांची आहे उलटीच व्यथा
दानपेटी समोर चाचपडतात खिशा

फाटक्या खिशातून निघत एखाद नाण
दानपेटित टाकून करतात गार्हाण
बस..झाल, आता हे तडजोडीच जीण
       
                           @ अशोक मटकर

No comments:

Post a Comment