सावळे हे रूप
गोजिरे सगुण
पाहता हरपली
तहान भूक
एकादशी वारीला
येती भक्तगण
भजनी कीर्तनी होई
सारा आसमंत दंग
दुथंडली चंद्रभागा
आली त्याच्या चरणी
लागे भक्ताची रांग
त्याच्या द्वारी
युगायुगाचा हा महिमा
काय वर्णु याची ख्याती
तिन्ही काळांचा अधिपती
विठ्ठल सावळा
रंक आणि राव
नाही इथे भेदभाव
विसरुनी सारे होती
एक...जातपात
चरणावरी ठेविता माथा
दुःख हरले आता
लाभे मनास समाधान
त्याच्या मंदिरी..
साकडे घालितो वारकरी
ठेव सुखिसमाधानी....
दे अंगात बळ...
येइन चालत पायी
तुझ्या वारीला
असा हा देव जगात आगळा
ज्याचा ठायी संताचा गोतावळा
भक्ताची माउली दिनांची साउली
अखंड उभा विठेवरी ठेउनी कर
कटेवरी....
@ अशोक मटकर
No comments:
Post a Comment