Monday, 27 July 2015

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे माया, प्रेम म्हणजे विश्वासरूपी छाया.
प्रेम म्हणजे वात्सल्यरूपी आई, प्रेम म्हणजे मंदिरातला साईं.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे मैत्रीची साद, प्रेम म्हणजे आपुलकीचा हात.
प्रेम म्हणजे नादितील पाणी, प्रेम म्हणजे मंजुळ गाणी.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे यशोदेचा कान्हा, प्रेम म्हणजे दुधारू गाईला फुटलेला पान्हा. प्रेम म्हणजे चिमुकला पाहुणा, प्रेम म्हणजे लागलेला जीव्हाळा.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे राबनारा बाप, प्रेम म्हणजे कुणाच्यातरी विरहाने लागणारी धाप, प्रेम म्हणजे बहिणीची राखी,
प्रेम म्हणजे मास्तरानी हातावर मारलेली काठी.

प्रेम म्हणजे काय?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे पाठीचा भाऊ ,प्रेम म्हणजे शिवबाची जिजाऊ. प्रेम म्हणजे पुरवलेली हौस, प्रेम म्हणजे मनातला पाऊस.

प्रेम म्हणजे काय?...तर नुसता नरमादीचा गेम नाय
प्रेम म्हणजे सुटलेले घर, प्रेम म्हणजे पाखराची घरटयाकडे परतीची ओढ. प्रेम म्हणजे मनातली खंत, प्रेम म्हणजे न कळणारा अंत.

प्रेम म्हणजे काय? तर...नुसता नरमादीचा गेम नाय
प्रेम म्हणजे केलेला त्याग ,प्रेम म्हणजे मनातली आग.
प्रेम म्हणजे शुध्द भावना ,प्रेम म्हणजे काहीच कळेना

प्रेम म्हणजे काय? तर...नुसता नरमादीचा गेम नाय.

                                 @ अशोक मटकर

No comments:

Post a Comment