Saturday 14 November 2015

कस जमतय तुला ??

कस  जमतय तुला ??
हे  सारे  करायला
दुःख पोटात लपऊन
चेहऱ्यावर हास्य फुलवायला

शिकवशील  का मला  तुझी
ही  वेगळी अदा जीच्यावर
झाले  माजे मनं  फिदा

तुझी  जगण्याची रीतच
निराळी येणार्या संकटाना
म्हणतस हट तिच्या मारी

नियतीने केला तूझ्या
पठित वार तरीही
आहेस तू  या जीवनरूपी
अश्वावर स्वार......

उमलनार्या भावनाना
मनातच दाबलस
भरलेल्या मोसमात
वैरागिपन स्वीकारलस

गुंतवलस स्वःताला कामात
इतके त्यामुळे बसत
नाहीत वेदनाचे  चटके

दुःखाने भरलाय मनाचा
काठ मग कशी आडवतस
या आसवाची वाट??.........

ही किमया जमते कशी तुला??
मला पण शिकव ना ही कला
कळू  नाही दिलास तूझा अंत
सांग ना कसा राहू मी शांत....

नाद मला माणस जपण्याचा
पुस्तका सारखं त्यांना वाचण्याचा
तू एक 'पुस्तक' ज्याचा शेवट एक कोड
कुणालाही न सुटणार ..... तूझ्याशिवाय

सांग !! ..ना
कस जमतय तुला ??
हे सार करायला
     
            @ अशोक शंकर मटकर
   

No comments:

Post a Comment