अजुनही आठवतेय ती
तांबडी माती आणि
ती रक्ताची नाती.......
ती गावाकडची शाळा
तो खडु आणि फळा
ती लाकडाची खुर्ची
तो कंरवंदीचा काटा
ते कामत गुरुजी..व
कानीटकर मास्तर
अजुनही आठवतोय
तो कोल्हयाचा माळ
आणि क्रिकेटचा खेळ
ती लाकडाची बँट
त्यासासाठी बाळुसुतारामागे
लावलेला वेळ
अजुनही आठवतेय तो
माहीचा सण आणि देवळातील
जागर..अन् भरनारा बाजार
ते चिरमुर्याचे लाडु ..आणि
रुपयाचे ट्रक ..ती ढोलावरची थाप
ते चंद्रुदाच गारान..आणि अंगावर
उमटणारा काटा.........
आठवतोय तो शिमग्याचा सण
ती होळीची ऊंची त्या घुघर्या ,हुंडरया
खोबर्याच्या काती..आणि पोस्ताची चटणी
ती नाचणारी राधा आणि पुरणाची पोळी
आठवतोय तो कडगावचा बाजार आणि
बांगड्याचा सार, गरम मिरची भजी ,कटवडा,
मिसळ वडपातली गर्दी आणि मावर्याचा वास
आजुनही आठवतेय ऊन्हाळ्यातील सुट्टी
कंरवंद-आंब्याची कंरबी, पिकलेला फणस
आणि मधाची गोडी लखुदाची गोठली आणि केळे आंबा
अजुनही आठवतेय ती मिरगाची सर
पेरणीची लगबग आणि ती घुट्यांची शर्यत
नव्यापाण्याच देवपान आणि मिरगवणीचा रस्सा
गुरांची कळप जांभळमाळ चटणीभाकर
किरव्याचा मोटला आणि हळदीच पान
आजुनही आठवतोय तो चतुर्थीचा सण
केलेली गणपतीची आरास माडाच्या मंडोळ्या
आणि कांगण्यांची फुले ती भजनाची साद
सुभाषदा गानसम्राट तो पोह्याचा फराळ
आणि दुधकम चाय जपुन वापरलेले फटाके
आणि चोरलेल्या बाहुल्या
अजुनही आठवतोय तो दिवाळीचा सण
शेणाच्या गौळणीनी सजवलेला गोठा
खाल्लेली आणि पोरीवर मारलेली कडु कारट
उटण्याची अंघोळ आणि नवी कापड
अजुनही आठवतायेत ते सुगीचे दिवस
कडक ऊन्हाची तिरप आणि भाताची कापणी
मळणीतील पाता आणि गवताची गंजी
ऊकडलेल्या शेंगा आणि नाचण्याची कणस
अजुनही आठवतोय वर्गणी काढुन केलेला थर्टी फस्ट
नव्हती तीथे चिकन बिर्यानी नव्हते तीथे मेन्युकार्ड
नव्हते तीथे एअरकंडीशन होता फक्त सिंगलमुखाचा गार वारा
गाव सुटल शहर गाठल नोकरीधंद्यापायी इथे पिझ्झा बर्गर नाना पक्वांन्न अवघ्या मिनटात होतात हजर पण गावाकडची चव मला कुठेही गवसली नाही...
अशोक मटकर