आई...............,
मनमंदिरातील देव
मायेची ठेव
कधीही न संपणारी
आई...........,
ज्ञानरुपी गुरु
तिजपासुन जिवनरुपी
अध्याय सुरू
आई........,
क्षणात राग
क्षणात माया
दोन जीव
एकच काया
आई................,
चुकावरच पांघरून
कानाला खडा
जिवनरुपी पुस्तकातील
न विसरण्याजोगा धडा
आई...............,
मनातली साठवण
पावलोपावली आठवण
तिच्या शिकवणूकीची
आई......,
शब्द नाही
पुरणार गाण्या तीची किर्ती
दाखवा जगी कोणी
अशी दुसरी मुर्ती
अशोक मटकर
No comments:
Post a Comment