नात तुझ माझ
कुणा नाही कळल
जिवनाच्या पुस्तकातील
पान हे हळव
मनामध्ये रुतला होता
नजरेचा काटा
समाजाच्या भयापोटी
दुभंगल्या होत्या वाटा
मुक झालेले शब्द
कधी नाही आले ओठी
मनातल्या मनात दडपली
गेल नवी नाती
दोन वेगळ्या वाटांचे
आपण दोघे वाटसरू
तु धरणी मी आभाळ
भेट होई क्षितिजावरी
क्षितिज म्हणजे भास
कल्पनेतला विलास
कधी झाली का भेट
धरणी-आभाळाची
तस नात तूझ माझ
अजुनही आठवतय
तुझ ते पाठमोर जान
अन् क्षणभर थांबुन
नकळत मागे वळुन पाहन
ओठ नाही हलले
शब्द नाही कळले
फक्त तुझे नयन बरसले
बरसणार्या आसवाची
कुणा कळली नाही खंत
असा झाला एका कहाणीचा अंत
-अशोक मटकर
No comments:
Post a Comment