Thursday 5 March 2015

होळी

होलीकेचे दहन
रंगाची उधळण
भावनांच शिंपण
नात्यांमधल.....

अंहकाराचा त्याग
क्रोधाची राख.....
नात्याची गुफंण
मनामधली.......

जुळती नवी नाती
होतात गाठीभेटी
नजरेतुन कळे...
प्रिती राधाकृष्णाची

लहानथोरांची लहर
आनंदाची बहर.....
कुणी करती कहर
भांग पिऊनी.....

नाही इथे भेदभाव
नाही इथे हेवेदावे
एकरूप होती सारे
रंगामधी............

गुळाची गुळवणी
पुरणाची पोळी
साजुक तुप....
स्वादाची परवणी

असा हा सण मोठा
नाही आनंदाला तोटा
शणभर विसरती सारे
रोजच्या वाटा...........
       
                     अशोक मटकर...

No comments:

Post a Comment