हरवलीय कुठतरी
ती कोबड्याची बांग आणि
जात्यावरील ओव्याची साद
तो पहाटेचा मंद वारा आणि
गोठ्यात वाजनार्या
दुधाच्या धारा
हरवलीय कुठतरी
ती ताकाची घुसळण आणि
गरमागरम भाकरीवरी
मऊ लोन्याची पसरण
ती चुलीत पेटनारी आग
आणि ऊकाळनार्या दुधाचा
पसरणारा स्वाद
हरवलाय कुठतरी तो
पांढरा खाकी ड्रेस आणि
त्यावर तांब्याने मारलेली प्रेस
ते कापडी दफ्तर आणि
ती दगडाची पाटी
ती सुरुची झाडे आणि
गोड सूकडी
हरवलीय कुठतरी ती
गावाबाहेरची शाळा आणि
तो दोस्ताचा मेळा
तो नदीचा काठ आणि
निवस्त्र केलेल्या
अंघोळीचा थाट
हरवलय कुठतरी
ते मोठाले घर आणि
मोठे कुटुंब त्या
आजीच्या गोष्टी आणि
गोधडीतली उब
हल्ली तू मी आणि
दोन पिल्ल इतकंच
आहे मोजकच कुटुंब
अडगळ होतेय इतरांची
आजी आजोबाही
राहतात दूर
नातवडाच्या विरहाने
भरुन येतोय त्यांचा उर
गावाकडच्या घरात
असतात ती पडून
समजावत मनाला की
हे ही दिवस
जातील उडून
परततिल पाखरे
पुन्हा घरट्याकडे
गजबजुन उठेल
घर सारे
त्यांच्या किलबिलाटाने
प्रेमाची व्याख्या ही
बदललीय आता
प्रत्येकाच्या वेगळ्याच कथा
हरवलाय कुठतरी
तो झुरनारा प्रियकर
हरवलीय ती ....
लाजनारी प्रेयसी
हल्ली जमाना
सेटिंगचा आलाय
सेटिंग नंतर
डेटिंग होते
डेटिंग नंतर
ब्रेकअप ही होते
मोजकीच नाती
चिरकाल टिकतात
अर्धी तर डेटिंगनंतर
विस्कटतात
पवित्र प्रेमाला चढलाय
वासनेचा माज कामातुराना
ना भय ना लाज
पूर्वी बसायची सात
जन्माची गाठ
आता लागते सात
महिन्यातच वाट
हल्ली सर्व मॉड झालेत
पहिल्यापेक्षा थोडे ऑड
झालेत म्हणतात की ही
काळाची गरज आहे...
म्हणून का रक्ताची नाती
दूर सरत आहेत???........
विचारा प्रत्येकाने आपल्या
मनाला काय हे खरच आहे
की हरवलोय कुठतरी??
आपण क्षणभंगुर सुखाच्या
शोधात कधीही न सूटनाऱ्या
मोहाच्या पाशात......
@श्री . अशोक शंकर मटकर