Wednesday, 18 February 2015

जिवनाची गाडी

जिवनाची गाडी
रूळावर धावते
आयुष्याचा धुर
हवेत सोडते

बालपणात ती
मजेत लोळते
फुलपाखरा सारखी
मुक्त बागडते

तारूण्यात ती
धुंदीत असते
ताकतीने स्व:ताच्या
दगडही फोडते.....

वार्धक्यात ती
अनुभव सांगते
शरीराचा भार
काठीवर पेलते

जिवनाची गाडी
रुळावर धावते
आयुष्याचा धुर
हवेत सोडते

धावता धावता
पेेट्रोल संपते
धुरही निघेना
इंजीनही थंडावते

खरं.....तर.....
इथे जिवनच...
संपते........
              .....अशोक मटकर

स्ञी-पुरूष

पुरूषाने कस दगडासारख
कणखर..असाव.............
आपल्या फोलादी बाहुत...
इतरांना सावराव.............

स्ञीन कस फुलासारख
कोमल असाव............
आपल्या सुवासान एखाद्याच
मन दरळवाव..................
                            . ...अशोक मटकर

दवा आणि दुवा

माणसाला ऊदरनिर्वाहासाठी जशी
संपत्ती जमवावी लागते,..तसेच...
त्याने आपल्या सदाचाराने व प्रेमळ
वागणुकीने माणसही जमवायला ...
शिकल पाहीजे, कारण एखाद्या कठीण
समयी किंवा आजारात...पैशाने खरेदी
केलेली दवा कामी येत नाही, तेव्हा....
त्यांचे हात दुवेसाठी ऊठतात...आणि..
मग...ती दुवा कामी येते...........
                                        ......अशोक मटकर

स्वप्न

माणसाने स्वप्न अशी पाहावीत , कि....
ती पुर्ण होतील कारण आपण पाहीलेले
एखादे...स्वप्न नाही पुर्ण झाल्यास आपण
दु:खी होतो आणि त्या दु:खाला आपण
स्वत: कारणीभूत असतो.....
                                     ----अशोक मटकर

यश-अपयश

यश मिळाले म्हणुन ,अति हुरळुन जाऊ नये
त्याचा आनंद सिमीत असावा, तसेच अपयश आले
म्हणुन अति दु:खीही होऊ नये त्या दु:खालाही सिमा असावी कारण, प्रत्येक काळ्या राञीनंतर एक सोनेरी दिवस ऊगवनार असतो.......अशोक मटकर

स्वार्थ-परमार्थ

आपन केलेल्या कामामुळे निव्वळ आपला फायदा होत असेल , तर तो 'स्वार्थ' ...आणि आपण केलेल्या कामामुळे दुसर्याचा काही फायदा होत असेल तर,...तो 'परमार्थ'
                                 ....

ईश्वर

मला परमेश्वर अस्तीत्वात आहे की नाही हे माहीत नाही...पंरतु...प्रत्येक गोष्टीला चालवणारी एक चेतन अशी शक्ती असते.....तशी या जगाला चालवणारी ...एक निराकार....दिव्य अशी शक्ती आहे ..तिची मी पुजा करतो व तिच्यावर माझी श्रध्दा आहे....
                                                    .  . ..अशोक मटकर

जगायच कशासाठी?

जगायच कशासाठी?
राबायसाठी..........

राबायच कशासाठी?
पोटासाठी............

पोट कशासाठी?,..
अन्नसंचयासाठी.......

अन्नसंचय कशासाठी?
जगायसाठी..............

जगायच कशासाठी?
राबायसाठी........

                  .  .. अशोक मटकर

एक मागने

एक देव मनी मानुनी
नित्य नेमे त्याच्या चरणी
एकच मागने मागत होतो

यश हे मागने ते...........
कष्टाला माझ्या यश दे
असे म्हणुन आळवित होतो

एकच मागने मागत होतो
यश हेच मागने .....ते......

परि, माझ्या वेड्या मनास काय ठाऊक?
अपयश यशाची पहीली पायरी.....
जेव्हा कोणी चढुन जाईल...............
तेव्हा नशीबी..........यश यईल.......

                         .. .....अशोक मटकर

मायबाप

मायबाप राबत्यात राञदिवसाला
भाकरी लागते ..पोरांच्या पोटाला

मायबाप एक कुंभार........
मुले ही मातीचा गोळा......

आकार देण्यात त्यांना....
त्यांचा जन्म जाई सगळा

मायबाप आपल्या पिल्लासाठी
पोटाला ......घालती गाठी......

मायबाप मुलांच्या भविष्यासाठी
आपली हाडे.....झिजवती........

धन्य ती माय......................
धन्य तो बाप........................

त्यांच्या रे ऊपकारास...............
नाही कोणते माप.....................

                                      ...अशोक मटकर

नशीब आणि जिवन

नशीब..............
एक शितीज .....
कल्पनेतल.......

जिवन...........
एक सत्य......
अस्तीत्वातल.....

नशीब............
खोटी आशा ...
मनातली.........

जिवन..........
राबुन रंगवायच..
सुंदर चिञ.......
     
                 .....अशोक मटकर

पहाटेच्या प्रहरी

पहाटेच्या प्रहरी
सुर्याची स्वारी
गुलाल ऊधळीत
डोंगरावर आली

त्याच्यांशी कळ्याची
नजरानजर झाली..
लाजुन त्यांची....
फुले ....झाली..

सुंगधात त्याच्या
पृथ्वी न्हाली....
गुराची कळपे...
चराया निघाली

शेतकरी दादांनी
नांगर धरली.....
गिरणीचा भोंगा
दुरवर झाला..

कामगार वर्ग
कामाला लागला
दिवसाची अशी
सुरवात झाली..
                  ..    अशोक मटकर

तु प्रवासी या रस्त्याचा......

आई..तु सांगीत होतीस..
जिवन म्हणजे एक रस्ता
तु प्रवासी या रस्त्याचा...
जाशील तु या रस्त्याने
जेव्हा तुला फुटतील पावले
सुरवातीला रुततील काटे...
कोमल तुझ्या  पायामध्ये
असह्य वेदना तुला जाणवतील
गळतील आसवे तुझ्या नयनातुनी
तेव्हा तीथे मी नसेन ...........
तुझी  ती आसवे पुसायला....
असतील फक्त आठवणी माझ्या
तुझ्या ऊरी रे ......दाटलेल्या
हळु हळु ऊमगेल तुला ...
या जिवनाची रितच न्यारी
सुख थोडे ..तर दु:ख भारी
सुख काय ..हिरवळ पावसातली
पाऊस आहे ..तोवर आहे......
नाहीतर मग.....ओसाड रान
दु:ख तसेच रे ....बाळा..
वाटेत येईल..असत्य रुपी काळोख
सत्याचा प्रकाश बरोबर ...घे...
आणि...अखंड चालत रहा .....
...हा रस्ता जिवनाचा..........
                          ....अशोक मटकर

Tuesday, 17 February 2015

जिवनाचा खेळ

जीवनाचा खेळ
नशीबाचा मेळ
कष्टाची रेल...
झुकझुक चाले
वाटेत वळने...
खड्याची धरने
यशाचे वळीव..
क्वचीतच गळे
        ....अशोक मटकर.