पहाटेच्या प्रहरी
सुर्याची स्वारी
गुलाल ऊधळीत
डोंगरावर आली
त्याच्यांशी कळ्याची
नजरानजर झाली..
लाजुन त्यांची....
फुले ....झाली..
सुंगधात त्याच्या
पृथ्वी न्हाली....
गुराची कळपे...
चराया निघाली
शेतकरी दादांनी
नांगर धरली.....
गिरणीचा भोंगा
दुरवर झाला..
कामगार वर्ग
कामाला लागला
दिवसाची अशी
सुरवात झाली..
.. अशोक मटकर
No comments:
Post a Comment