Wednesday, 18 February 2015

मायबाप

मायबाप राबत्यात राञदिवसाला
भाकरी लागते ..पोरांच्या पोटाला

मायबाप एक कुंभार........
मुले ही मातीचा गोळा......

आकार देण्यात त्यांना....
त्यांचा जन्म जाई सगळा

मायबाप आपल्या पिल्लासाठी
पोटाला ......घालती गाठी......

मायबाप मुलांच्या भविष्यासाठी
आपली हाडे.....झिजवती........

धन्य ती माय......................
धन्य तो बाप........................

त्यांच्या रे ऊपकारास...............
नाही कोणते माप.....................

                                      ...अशोक मटकर

No comments:

Post a Comment