जिवनाची गाडी
रूळावर धावते
आयुष्याचा धुर
हवेत सोडते
बालपणात ती
मजेत लोळते
फुलपाखरा सारखी
मुक्त बागडते
तारूण्यात ती
धुंदीत असते
ताकतीने स्व:ताच्या
दगडही फोडते.....
वार्धक्यात ती
अनुभव सांगते
शरीराचा भार
काठीवर पेलते
जिवनाची गाडी
रुळावर धावते
आयुष्याचा धुर
हवेत सोडते
धावता धावता
पेेट्रोल संपते
धुरही निघेना
इंजीनही थंडावते
खरं.....तर.....
इथे जिवनच...
संपते........
.....अशोक मटकर
No comments:
Post a Comment