Wednesday, 18 February 2015

तु प्रवासी या रस्त्याचा......

आई..तु सांगीत होतीस..
जिवन म्हणजे एक रस्ता
तु प्रवासी या रस्त्याचा...
जाशील तु या रस्त्याने
जेव्हा तुला फुटतील पावले
सुरवातीला रुततील काटे...
कोमल तुझ्या  पायामध्ये
असह्य वेदना तुला जाणवतील
गळतील आसवे तुझ्या नयनातुनी
तेव्हा तीथे मी नसेन ...........
तुझी  ती आसवे पुसायला....
असतील फक्त आठवणी माझ्या
तुझ्या ऊरी रे ......दाटलेल्या
हळु हळु ऊमगेल तुला ...
या जिवनाची रितच न्यारी
सुख थोडे ..तर दु:ख भारी
सुख काय ..हिरवळ पावसातली
पाऊस आहे ..तोवर आहे......
नाहीतर मग.....ओसाड रान
दु:ख तसेच रे ....बाळा..
वाटेत येईल..असत्य रुपी काळोख
सत्याचा प्रकाश बरोबर ...घे...
आणि...अखंड चालत रहा .....
...हा रस्ता जिवनाचा..........
                          ....अशोक मटकर

No comments:

Post a Comment